ट्वीटरने प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे की, तब्बल 11 मिनीटांपर्यंत ट्रम्प यांचे अकाऊंट बंद झाल्यानंतर पुन्हा सुरु करण्यात आले.अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्वीटर अकाऊंट गुरुवारी सायंकाळी 11 मिनीटांसाठी गायब झाले होते. यादरम्यान ट्रम्प यांच्या कार्यालयीन ट्वीटर अकाऊंट @realDonaldTrumpसर्च केल्यानंतर मॅसेज येत होता की, सॉरी, हे अकाऊंट सध्या अस्तित्वात नाही. ट्वीटरने या घटनेनंतर लगेचच सांगितले की, कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे ट्वीटर अकाऊंट बंद झाले होते.काही लोकांचे म्हणणे आहे की, उत्तर कोरियाला धमकी दिल्याने ट्वीटरने ट्रम्फ यांचे खाते बंद केले ट्रम्प यांचे ट्वीटरवर तब्बल चार कोटी फॉलोअर्स आहेत. ट्रम्फ यांना स्वत:ला ट्वीटर खूप आवडते.2012 मध्ये ट्रम्प म्हणाले होते की, सोशल मीडिया न्यूजपेपरप्रमाणे वाटतो. यामुळे कुठलेही नुकसान होत नाही.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews